भुसावळ । रेल्वेने आगामी सणासुदीच्या काळात प्रवास करणाऱ्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी मागणी लक्षात घेता, तसेच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दिवाळी आणि छटपूजेसाठी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने २८ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजेच या गाड्या भुसावळ मार्गे धावणार असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला.
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई बनारस साप्ताहिक विशेष (क्र. ०१०५३) गाडी ३० ऑक्टोबर व ६ नोव्हेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १२:१२ वाजता सुटेल आणि बनारस येथे दुसऱ्या दिवशी ४:०५ वाजता पोहोचेल. लोकमान्य टिळक टर्मिनस दानापूर द्वि-साप्ताहिक विशेष गाडी (क्र. ०१००९) ही द्वि-साप्ताहिक गाडी २६ व २८ ऑक्टोबर, १ व ४ नोव्हेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १२:१५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी ५ वाजता पोहोचेल.
०१०४३) साप्ताहिक विशेष गाडी ३१ ऑक्टोबर आणि ७ नोव्हेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२:१५ वाजता सुटेल आणि समस्तीपूर येथे दुसऱ्या दिवशी रात्री ९:१५ वाजता पोहोचेल. लोकमान्य टिळक टर्मिनस- प्रयागराज साप्ताहिक (क्र. ०१०४५) ही साप्ताहिक गाडी २९ ऑक्टोबर आणि ५ नोव्हेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १२:१५ वाजता सुटेल आणि प्रयागराज येथे दुसऱ्या दिवशी ११:२० वाजता पोहोचेल. (२ सेवा) लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर द्वि-साप्ताहिक विशेष (क्र. ०११२३) द्वि-साप्ताहिक गाडी २५ व २७ ऑक्टोबर, १ व ३ नोव्हेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १२:१५ वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी ६:५५ वाजता येथे पोहोचेल. या सर्व रेल्वे गाड्यांना कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खांडवा या ठिकाणी थांबे असतील.