दिवाळी मुहूर्तावर सोने-चांदी घसरली, आजचा प्रति 10 ग्रॅमचा भाव किती?

जळगाव : सध्या दिवाळीचा उत्साह ओसांडून वाहत असून धनत्रयोदशीला सोने-चांदीच्या किंमती वाढलेल्या असतानाही ग्राहकांनी खरेदीचा नवीन रेकॉर्ड केला. भावात मोठी वाढ झाली असतानाही सराफा पेठा गजबजलेल्या होत्या. यंदा धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला सोन्याच्या भावात ४०० रुपयांची घसरण झाली होती. मात्र धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर १५० ते २००  रुपयांची वाढ झाल्याने सोने ६० हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले होते.

दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. शनिवार सोन्याच्या दरात ३०० रुपयांची घसरण झाली व ते ६० हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर आले. तर चांदीचा दर ७२ हजार रुपये प्रति किलोवर आली आहे.दरम्यान, लक्ष्मीपूजनच्या एक दिवस आधी सोने आणि चांदीचा दर घसरला असून हेच भाव आज म्हणजेच रविवार कायम राहण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, जळगावच्या सुवर्णनगरीत धनत्रयोदशीच्या दिवशी १५० कोटीहून अधिक रुपयांची सोन्याची तर त्याहून अधिक चांदीच्या दागिन्यांची विक्री झाली झाली. मागील वर्षापेक्षा ही रक्कम २० टक्क्यांहून अधिक असल्याचंही सोने विक्रेत्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे मागील वर्षी सोन्याचे दर हे ५० हजार रुपयांच्या घरात होते. यंदा तेच दर ६० हजार रुपयांच्या वर असतानाही खरेदीमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये नोकरदार, व्यापारी वर्गापासून सर्वच क्षेत्रातील ग्राहकांमध्ये सहभाग असल्याची माहिती सोने व्यावसायिकांनी दिली आहे.