---Advertisement---
अमळनेर : मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून ३५४ दिव्यांगांना २० लाखांचे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार स्मिता वाघ व माजी जि.प.सदस्या जयश्री पाटील हे उपस्थित होते.
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर १९ जानेवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार स्मिता वाघ, माजी जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील,माजी नगरसेवक प्रा.अशोक पवार,सामाजिक कार्यकर्ते देविदास देसले,भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,दिव्यांग संघटनेचे बिरजू चौधरी यांनी मार्गदर्शन केले.यावेळी ना.आनिल भाईदास पाटील यांनी मंत्रालयातूनच भ्रमणध्वनीद्वारे उपस्थितांशी चर्चा केली. यावेळी दिव्यांगांना तीनचाकी सायकल,व्हील चेअर,कर्णयंत्र,कुबड्या, अंधकाठी,वाकर,इलेक्ट्रिक काठी जयपूर कृत्रिम पाय तसेच इतर २५ प्रकारची उपकरणे वाटप करण्यात आली.
यावेळी मार्केटचे सभापती अशोक पाटील,संचालक समाधान धनगर,भाईदास भिल,विजय पाटील,व्ही.आर.पाटील,भिकेश पाटील,प्रवीण पाटील,मुक्तार खाटीक,रणजित पाटील,महेंद्र बोरसे,प्रा.सुरेश पाटील,तारकेश्वर गांगुर्डे,पंकज साळी, उमाकांत साळुंखे,जयंतलाल वानखेडे,संजय पाटील,प्रताप शिंपी,दीपक पाटील,अमोल पाटील,करीम बागवान,सुनील शिंपी,नीलेश पाटील,निलेश देशमुख,राहुल गोत्राल,भूषण पाटील,प्रदीप पाटील,निनाद शिसोदे,शोएब शेख आदी मान्यवर उपस्थित होते. दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहित्य मिळाल्यामुळे त्यांनी ना.अनिल पाटील यांचे आभार मानले.सूत्रसंचालन शरद सोनवणे व वसुंधरा लांडगे यांनी केले तर आभार विनोद कदम यांनी मानले.