पारोळा : जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील दिव्यांग विभागाकडून तपासणी अंती जे नागरिक दिव्यांग ठरले आहेत. अश्या लाभार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी संबंधित विभागाकडून गेल्या ४/५ महिन्यापासून टोलवाटोलवी केली जात आहे. परिणामी पात्र लाभार्थ्यांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे.
पारोळा शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळावे, यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केलेले आहेत. अपंग बांधव यांनी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये अपंगत्वाची तपासणी केली आहे. त्यात ते शासनाच्या निकषानुसार अपंग ठरले. तसे त्यांना कळविण्यात देखील आले. मात्र प्रमाणपत्र ऑनलाईन व व्हाट्सअप वर पाठवू तुम्ही तिकडे काढून घ्या असे उत्तर संबंधित डॉक्टरांकडून अनेक वेळा मिळाल्याच्या आरोप अपंग बांधवांनी केला आहे.
दिव्यांग बांधवांची टोलवाटोलवी
गेल्या ४/५ महिन्यापासून दिव्यांग बांधवांना सबधितकडून प्रमाणपत्र पाठवू काम सुरू आहे. ऑनलाइन तुम्ही काढून घ्या व्हाट्सअपने पाठवू तुम्ही इथे या, अशी वेगवेगळी उत्तरे अनेक अपंग बांधव संबंधित विभागाकडून मिळते. पायाच्या अपंग हाताचे अपंग डोळ्यासंदर्भात तक्रारी असलेले काही अपंग कर्णबधिर असे रुग्णचे प्रमाणपत्र जळगाव सिव्हिल हॉस्पिटलचे दिव्यांग विभागकडे चकरा मारीत आहेत. विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हा शल्य चिकित्सक डाँ. किरण पाटील यांनी लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी दिव्यांग बांधवांनी केली आहे.