---Advertisement---

दीपिका पादुकोण बनली आई, गोंडस बाळाला दिला जन्म

---Advertisement---

Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग ज्याची गेल्या नऊ महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस अखेर आला आहे. दीपिका पादुकोण रविवारी आई झाली. मुंबईच्या एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये तिने मुलीला जन्म दिला.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दीपिकाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र त्यानंतर बेबी बंप दिसत नसल्याने नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला होता.

इतकंच नव्हे तर जेव्हा दीपिका बेबी बंपसह दिसली, तेव्हासुद्धा ते ‘फेक’ असल्याची टीका काहींनी केली. काही दिवसांपूर्वीच मॅटर्निटी फोटोशूटचे काही खास फोटो पोस्ट करत दीपिकाने त्या सर्व ट्रोलर्सना अखेर सडेतोड उत्तर दिलं होतं.

लग्नाच्या 6 वर्षांनंतर दीपिका-रणवीर एका छोट्या देवदूताचे पालक झाले आहेत. ही बातमी समोर येताच या जोडप्याचे अभिनंदन करण्याची प्रक्रिया सुरू झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, दीपिकाने सी-सेक्शनद्वारे आपल्या मुलीला जन्म दिला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment