दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेल्या रकमेवर चोरट्यांचा डल्ला; एरंडोलातील घटना

एरंडोल : तालुक्यातील निपाणे येथील शेतकरी अशोक मन्साराम पाटील यांनी येथे भारतीय स्टेट बँक शाखेतून सोने तारण ठेवून दोन लाख रुपयाचे कर्ज काढले ही रक्कम दुचाकीच्या डिकीत ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने ती लंपास केली. ही  घटना १२ मार्च रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एरंडोल तालुक्यातील अशोक मन्साराम पाटील हे शेतकरी हे एम एच १९ बी डब्ल्यू ३०५८ क्रमांकाच्या त्यांच्या एरंडोल येथे भारतीय स्टेट बँक शाखेत सोने तारण कर्ज घेण्यासाठी आले असता बँक शाखेत जाऊन सोने तारण कर्ज मंजूर करून त्याची मिळणारी दोन लाख रुपयाची रक्कम त्यांनी ताब्यात घेतली सदर रक्कम पिशवीमध्ये ठेवली व बँक शाखेबाहेर येऊन त्यांच्या दुचाकी च्या डिक्की मध्ये ठेवली व लॉक केली.

दुचाकी घेऊन थोड्या अंतरावर ते गेले असता सातबारा उताऱ्याची झेरॉक्स प्रत काढण्यासाठी ते झेरॉक्स दुकानावर गेले व मोटर सायकलची देखील उघडी बघितले असता डिक्कीमध्ये ठेवलेले दोन लाख रुपयाची रक्कम व सात बारा चा उतारा सोने तारण कर्ज पावती आधार कार्ड स्टेट बँकेचे पासबुक व चेक बुक हे ठेवलेल्या ठिकाणी दिसून आलेले नाही त्याबाबत स्टेट बँक शाखेच्या परिसरात व एरंडोल शहरात शोध घेतला असता सदर रक्कम मिळून आली नाही कोणीतरी अज्ञात चोरट्याने सोने तारण कर्जाची रक्कम चोरून नेल्याचे उघडकीस आले. याबाबत पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब फौजदार सुनील लोहार, योगेश महाजन राजेश पाटील अनिल पाटील हे पुढील तपास करीत आहेत.