अमळनेर : तालुक्यातील साकरे येथील विकी पारधी (३०) हे प्रताप महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलावर बुधवार, १० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता दुचाकी अपघातात जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, आज गुरूवार रोजी पहाटे ३ वाजता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अमळनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अमळनेर तालुक्यातील साकरे येथे विकास पारधी हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्यास होता. सेंटिग काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होतो. बुधवार १० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता कामावरून अमळनेर येथून कळमसरे येथे जाण्यासाठी दुचाकीने निघाला. अमळनेर शहरातील ताप महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलावर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. त्याला तातडीने अमळनेर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले हेाते. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी त्याला धुळे येथे रवाना केले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना गुरूवारी ११ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्याच्या या अपघाती मृत्यूमुळे परिवारातला कर्ता पुरुष गेल्याने परिवाराचा आधारच हरपला. यामुळे त्याची आई, पत्नी, बहीण लहान भाऊ यांचे दुःख पाहून ग्रामस्थांनाही अश्रू अनावर झाले होते. दुपारी ३.३० वाजता कळमसरे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात सर्वांशी मितभाषी बोलणारा विकासचे अचानक जाण्याने कळमसरे सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तो येथील प्राथमिक शिक्षक गणेश पारधी यांचा भाचा असून त्याच्या पच्यात आई, पत्नी, बहीण व भाऊ असा परिवार आहे.