जळगाव : श्रावण सोमवार निमित्त दर्शनासाठी गेलेल्या तीन तरुणाचा पाण्यात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पट्टीचे पोहणाऱ्यांकडून बुडालेल्याचा शोध घेणे सुरू असल्याचे माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच परिविक्षाधीत उपविभागीय अधिकारी अप्पासो पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
श्रावण सोमवार निमित्त जिल्ह्यातील महादेव मंदीरात विविध कार्यक्रम साजरे होत आहे. अनेक भाविक भक्त कावड यात्रेचे आयोजन करून महादेव मंदीरावर दर्शनासाठी जात आहे. एरंडोल शहरातील काही तरूण देखील आज सकाळी ४ वाजता वाहनातून जळगाव तालुक्यातील गिरणा, तापी या त्रिवेणी संगमावरील रामेश्वर महादेव मंदीरावर दर्शनासाठी गेले. मात्र, यातील तीन जण दुपारी तीन वाजता पाण्यात बुडाल्याची घटना घडली.
दरम्यान, पोलीस प्रशासन आणि आपत्ती विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाल्याचे समोर आले आहे. पट्टीचे पोहणार्या तरूणांकडून बुडालेल्याचा शोध घेणे सुरू असल्याचे माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच परिविक्षाधीत उपविभागीय अधिकारी अप्पासो पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेहांचा शोध सुरूच आहे.