तरुण भारत लाईव्ह । १३ सप्टेंबर २०२३। एक मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. आधी दोन मुली त्यात तिसरी ही मुलगी झाल्याने बापानेच आठ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू देऊन तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. आशा कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, हरीनगर तांडा येथील रहिवासी गोकुळ जाधव याला दोन मुली आहेत. शनिवारी वाकोडे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तिसरी मुलगी त्याला झाली. आणि रविवारी गोकुळने चिमुरडीच्या तोंडात तंबाखू देऊन तिची हत्या केली एवढंच नाही तर परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावली. यानंतर अशा सेविका या नवजात जन्माची नोंद घेण्यासाठी गोकुळच्या घरी गेल्या त्यावेळी चिमुरडी तेथे नव्हती अशा सेविकेने ही माहिती वरिष्ठांना कळवली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप कुमावत हे मंगळवारी कागद पोहोचले त्यांनी सुरुवात केली आजारपणाने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले डॉक्टर कुमावत यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केले त्यावेळी त्याला चिमुरडीला मारण्याची कबुली दिली.
गोकुळणे रविवारी चिमूरडी चा तोंडात तंबाखू दिला तिला झोळीत झोपवले यामध्ये तिचा मृत्यू झाला रात्री फरदापुर ते वाकोद रस्त्यावर खड्डा खोदून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे आरोग्य पथकाच्या तपासात निष्पन्न झाले आहे. गोकुळ जाधव विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला.