---Advertisement---

दुर्देवी! वाढदिवसाला आला नाही यावरून रागाच्या भरात दोघांनी मित्राला संपवलं

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । १० ऑक्टोबर २०२३। उल्हासनगर मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वाढदिवसाला केक कापायला आला नाही म्हणून रागाच्या भरात मित्रानेच त्याची हत्या केल्याची घटना घडली. या हल्य्यात तो जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते पण त्यानंतर काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, प्रदीपच्या दोन्ही मित्रांचा वाढदिवस होता. त्याचं सेलिब्रेशन चौकात करण्यात आलं. यानंतर त्यांनी केक कापला. पण वाढदिवसाचा केक कापायला प्रदीप आला नव्हता. ही गोष्ट दोघांनाही खटकली. रागाच्या भरात या दोघांनी प्रदीपच्या पोटात चाकू भोसकला. यात तो गंभीर जखमी झाला होता. प्रदीपला जखमी अवस्थेत उल्हासनगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती अधिकच खालावत गेली. आज मंगळवारी त्याचा मृत्यू झाला.

मारेकऱ्यांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका तरुणाच्या कुटुंबीयांनी घेतली आहे. घटनेतील आरोपी हे अल्पवयीन असून त्यातील एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. इतके दिवस होऊनही पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली नसल्याने प्रदीपचे कुटुंबीय संताप व्यक्त करत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment