पाचोरा : वलवाडी येथे वळणावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत समिर सोमवंशी या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २५ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृताची नोंद करण्यात आली.
तालुक्यातील बाळद येथील सर्वेश मेडीकलचे संचालक समिर सोमवंशी हा युवक २५ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पारोळाला जात होता.
दरम्यान, वलवाडी गावा नजिक वळणावर एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात समिर सोमवंशी हा गंभीर जखमी झाला. त्यास तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी अंती मृत्यू झाल्याचे सांगितले.
मयत समिर च्या पश्चात यास आई, भाउ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. परीसरात मेडिकल आणि कृषी केंद्राचा त्याचा व्यवसाय होता. समिर सोमवंशी हा मनमिळाऊ स्वभावाने असल्याने परीसरात त्याच्या निधनाच्या बातमी ने हळहळ व्यक्त होत आहे. शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.