---Advertisement---

दुर्दैवी ! घराची भिंत कोसळली, सात वर्षीय मुलाचा मृत्यू

---Advertisement---

यावल : तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथे घराची भिंत कोसळून राजरत्न सुपडू बाऱ्हे (७) याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

यावल तालुक्यातील सांगवी बु. येथे राजरत्न सुपडू बाऱ्हे (७) हा खेळत असताना, अचानक प्रमोद सोनवणे यांच्या घराची जीर्ण झालेली भिंत कोसळली. यामुळे राजरत्न भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दाबला गेल्याने त्याचा गुदमरून दुदैवी मृत्यू झाला.

यावलच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषीत केले. यावेळी यावल ग्रामीण रूग्णालयाच्या परिसरात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment