दुर्दैवी ! जलशुद्धीकरण केंद्रात विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव : विद्युत शॉक लागून 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास भुसावळात घलडी. सखाराम बारेला (१६) असे मृत मुलाचे नाव आहे. मृतदेह रेल्वे रुग्णालयात नेण्यात आला असून त्या ठिकाणी लोक संघर्ष समितीने अधिकाऱ्यांनी रेल्वेचे अधिकारी आल्याशिवाय बोलणी केल्याशिवाय शवविच्छेदन व मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

भुसावळ रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेसाठी लागणाऱ्या पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टर हाऊस मधील डग मध्ये साचलेला गाळ गेल्या एक महिन्यापासून कामगार काढत आहेत. ज्या डग मध्ये गाळ साचलेला आहे ती बारा ते पंधरा फूट खोल असल्याने त्या ठिकाणी क्रेनच्या सहाय्याने गाळ काढण्यात येत आहे.

हे इमर्जन्सी काम असल्याने याचे कोणत्याही प्रकारचे टेंडर काढण्यात आलेले नव्हते. रेल्वेचे सीनियर सेक्शन अभियंता यांनी हा ठेका दिलेला होता. हा गाळ काढण्यासाठी जामनेर तालुक्यातील गंगापूर येथील दयाराम दिलीप बारेला, बिना दिलीप बारेला, रवी दिलीप बारेला, श्याम रालू बारेला, सुनील मंगलसिंग बारेला व मयत सखाराम जिना बारेला हे काम करीत होते.

दरम्यान शुक्रवारी (दि. १६) दुपारी १२ वाजता ही दुर्घटना घडली. अचानक त्या ठिकाणी असलेल्या मशीनमध्ये विद्युत प्रवाहाचा शॉक लागून सर्व कामगार बाहेर फेकले गेले. यामध्ये सखाराम जिना बारेला वय-१७ रा. गंगापूर ता. जामनेर असे मयत झालेल्या अल्पवयीन कामगाराचे नाव आहे. त्याचा मृतदेह हा रेल्वे रुग्णालयात ठेवण्यात आलेला आहे. या ठिकाणी लोक संघर्षाचे उपाध्यक्ष सचिन धांडे, चंद्रकांत पाटील, जिल्हा संपर्क सिताराम सोनवणे व इतर कार्यकर्ते रेल्वे दवाखान्यात उपस्थित होते.