---Advertisement---

दुर्दैवी! दुपारची वेळ, बालक शेतात खेळत होतं, अचानक बिबट्यानं ओरबाडलं

---Advertisement---

धुळे : शेतात खेळत असताना अचानक बिबट्याने हल्ला केल्याने सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. हार्दिक उर्फ स्वामी दीपक रोकडे असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, तीन दिवसांच्या अंतरात दोन लहान बालकांचा मृत्यू झाल्याने दहशतीचे वातावरण आहे.

धुळे तालुक्यातील बोरकुंड येथे ही घटना घडलीय. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाच्या कारभारावर रोष व्यक्त करीत शिरूड-बोरकुंड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

दरम्यान दसऱ्याच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे गाव हळहळ व्यक्त केली जात आहे. स्वामी दीपक रोकडे असे मयत मुलाचे नाव आहे. तो आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास शेतात खेळत होता. तेव्हा अचानक बिबट्याने हल्ला करीत त्याला उचलून घेऊन ठार केले.

या घटनेनंतर बोरकुंड परिसरातील नागरिकांनी शिरुड-बोरकुंड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. यावेळी वनविभाग आणि पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर रोष व्यक्त करण्यात आला.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment