---Advertisement---

दुर्दैवी ! बालिका कूलर सुरु करायला गेली अन् नको ते घडलं; जळगावातील घटना

---Advertisement---

जळगाव : कुलर सुरू करत असताना विजेचा धक्का लागल्याने १२ वर्षीय बालिकेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. जळगाव तालुक्यातील किनोद गावात शुक्रवार, १२ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जळगाव तालुका पोलिसात नोंद घेण्याचे काम सुरू होते. अक्षदा किशोर मोरे (१२) असे मृत बालिकेचे नाव आहे.

जळगाव तालुक्यातील विनोद गावात अक्षदा मोरे ही आपल्या आई आणि दोन बहिणींसह राहत होती. तिचे वडील किशोर मोरे यांचे एक वर्षांपूर्वी दुर्धर आजाराने निधन झाले आहे. तर आई ही हात मजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होती. अशातच आज शुक्रवार, १२ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अक्षदाने कुलर सुरू करण्यासाठी विजेचे बटन दाबण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळेला विजेचा जोरदार धक्का बसल्याने अक्षदा ही जोरात फेकली गेली. कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी शेजारच्या नागरिकांच्या मदतीने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दाखल केले. तिथे तपासणी करून वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी तिला मयत घोषित केले.

यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment