तळोदा : तालुक्यातील काजीपुर शिवारात मंगळवार, २० रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून आजीसह नातूला ठार केले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडली असून, तात्काळ वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
तालुक्यातील काजीपूर शिवारात अतुल पाढूरंग सुर्यवशी यांच्या मळ्यात रखवाली करणारी साकरा खेमा तडवी (५०) ही मजुरीसाठी गेली होती. मात्र तिला उशीर झाल्याने नातू श्रावण शिवाजी तडवी (९ ) हा शोधण्यासाठी गेला. दरम्यान, उचानक बिबट्याने हल्ला करून त्याला ऊसात फरफट नेले. त्याचा आवाज आजीला आल्याने ती त्याच्या मागे धावली; मात्र तिच्यावर देखील बिबटयाने हल्ला केल्याने तिचा मृत्यू झालाय. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी दाखल झाले.दोघा मृतदेह शवविच्छेधनासाठी तळोदा उपाजिल्हा रुग्नालयात नेण्यात आले.
दरम्यान, आठवडापूर्वी चिनोदा येथे देरवीले बिबटया हल्त्यात एक बालक मृत्यु झाल्याची घटना ताजी असताना परत बिबट्या हल्यात दोन जणाचा बळी गेला आहे. आता तरी वनविभाग बिबटचाला जेरंबद करेला का ? असा प्रश्न उपस्थीत होते आहे.