नंदुरबार : भरधाव एस.टी. बसने दिलेल्या धडकेत ५१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दहिंदुले, ता. नंदुरबार येथे घडली. या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात एस.टी.बस चालकाविरुद्ध अपघातान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. साखराबाई लोटन कोतवाल (५१), रा. दहिंदुले, ता. नंदुरबार असे मयत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावाच्या बसस्थानकाजवळील रस्त्यावर भरधाव जाणाऱ्या एसटी बसने (एमएच २० बीएल १४२०) रस्त्याने जाणाऱ्या साखराबाई यांना जबर धडक दिली. त्यात त्यांना जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत लोटन रत्या कोतवाल यांनी फिर्याद दिल्याने बसचालकाविरुद्ध नंदुरबार तालुका पोलिसात अपघातान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास तळोदा पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अण्णासाहेब रेवगरे करीत आहेत.