---Advertisement---

दुर्दैवी ! मित्रांसोबत पोहायला गेलाअन् अनर्थ घडला; तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

---Advertisement---

जळगाव : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या २५ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाला. ही घटना गुरूवार, २९ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास लोणवाडी येथे घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. महेंद्र पाटील (२५) असे मयत तरूणाचे नाव आहे.

जळगाव तालुक्यातील लोणवाडी येथे महेंद्र पाटील हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. गुरुवार, २९ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास महेंद्र हा त्याच्या मित्रांसोबत गावातच असलेल्या विहिरीत पोहण्यासाठी गेला. दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने महेंद्र हा सुमारे ७० फुट खोल पाण्यात बुडाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

यावेळी सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड केली. घटनास्थळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोहेकॉ प्रदीप पाटील, पोहेकॉ स्वप्नील पाटील यांनी धाव घेतली. तरूणांच्या मदतीने महेंद्रचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment