दुर्दैवी ! लाकडे घेवून जाताना मधमाश्यांनी केला हल्ला, ट्रॅक्टर कोसळली थेट तापी नदीत

जळगाव : लाकडे घेवून जाताना अचानक मधमाश्यांनी ट्रॅक्टर चालकावर हल्ला केल्याने ट्रॅक्टर थेट तापी नदीत कोसळले.  या अपघात ट्रॅक्टरचालकाचा दबुन जागीच मृत्यू झाला. ही घटना नांद्रा येथे आज गुरूवार, ८ रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने नांद्रा गावात हळहळ व्यक्त होत आहे. वासूदेव गोपीचंद सपकाळे (४५, रा. नांद्रा ता.जि.जळगाव) असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.

जळगाव तालुक्यातील नांद्रा येथे वासूदेव गोपीचंद सपकाळे हे आपल्या ककुटुंबीयांसह वास्तव्याला होते. नांद्रा गावात त्यांच्या मामी यांचे निधन झाले होते. त्यांच्या दहाव्याचा कार्यक्रम असल्याने वासूदेव सपकाळे हे आज गुरूवार, ८ रोजी दुपारी लाकडे घेण्यासाठी ट्रॅक्टरवर एकटेच गेले होते. लाकडे भरून नांद्रागावाकडे तापी नदीच्या रोडने येत असताना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. यामुळे त्यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने  ट्रॅक्टर थेट तापी नदीत कोसळले. या अपघातात वासूदेव सपकाळे यांचा जागेवरच मृत्यू झाला.

ही घटना घडल्यानंतर काही अंतरावर गावातील अजय दिलीप सोनवणे हा तरूण नदीच्या काठावरील विहीरीजवळ काम करत असताना त्यांच्या लक्षात आले. तो  आरडाओरड करत घटनास्थळी दाखल झाला, गावातील ग्रामस्थ व तरूणांनी धाव घेत वासूदेव सपकाळे यांचा मृतदेह बाहेर काढला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.