जळगाव : थोरपाणी (ता.यावल) येथील आदिवासी पाड्यावर वादळाने चौघांचा बळी घेतल्याची घटना २६ मे रोजी घडली होती. दरम्यान, आता प्रशासनाने येथे सर्वतोपरी सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता येथील आदिवासी बांधवांना दिलासा मिळणार आहे.
यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीतील अतिदुर्गम क्षेत्रातील वन विभागाच्या वनपरिक्षेत्र, यावल पश्चिम परिमंडळ वाघझीरा, यातील कक्ष क्रमांक १०७, यात वसलेले थोरपाणीपाडा या आदिवासींची वस्ती आहे. २६ मे रविवार रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वार्यामुळे झोपडी कोसळुन एकाच कुटुंबातील चौघांचा गुदमरून करुण अंत झाला. नानसिंग गुला पावरा (२८) ,पत्नी सोनुबाई नानसिंग पावरा (२३) त्यांची दोन लहान मुल रतिलाल नान सिंग (३ ) बालीबाई नानसिंग पावरा (२) असे मृतांचे नावे आहेत.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊनउप वनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव जमीर शेख यांनी तात्काळ मदत कार्य पोहोचविण्या साठीसंबंधित अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ विशेष सुचना दिल्या. महसूल व पोलीस प्रशासनासोबत वनविभागाचे पथक देखील घटनास्थळी उपस्थित होते.
२७ रोजी स्वतःउपवनसंरक्षक यावल वन विभाग जळगाव जमीर शेख हे भुसावळचे आमदार संजय सावकारे ह्यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरूण पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, डॉ.कुंदन फेगडे, आदिवासी विभागाचे निरिक्षक जावेद तडवी तसेच वनपरिक्षेत्र यावल पश्चिम यातील वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे व कर्मचारी यांचे सह पक्ष क्रमांक १०७ यातील पाडा येथील घटनास्थळी पोहचून संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. तसेच त्या भागात इतरही झोपड्यांचे व घरांचे झालेले नुकसानाची पाहणी केली.
घटनास्थळी आदिवासी विकास प्रकल्प यावलचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी उपस्थित राहुन मयत आदिवासी कुटूंबाच्या अंतविधी साठी तात्काळ ५० हजार रूपयांची मदत मयताचे नातेवाईकांच्या स्वाधिन केले.
आता पक्की घरे, प्राथमिक आरोग्य केंद्र…
गावातील लोकांसाठी शासकीय योजनांच्या माध्यमातुन या ठिकाणी पक्की घरे ,प्राथमिक आरोग्य केंद्र आंबापाणी येथे बांधण्याचे प्रयत्न केले जातील जेणे करून सर्व शासकीय सुविधा आदिवासी बांधवांना मिळतील असे आश्वासित करण्यात आले.