---Advertisement---

दुर्दैवी! सकाळची वेळ, घराची साफसाफाई करत होता, अचानक तरुणासोबत काय घडलं?

---Advertisement---

जळगाव : घराची साफसाफाई करताना विजेचा धक्का लागल्याने १६ वर्षीय तरुणाचा दुदैवी मृत्यू झाला. जळगाव शहरातील गणेश कॉलनीत आज १ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. सुनिल संजय चव्हाण (१६) रा. मन्यारखेडा ता.भुसावळ असे मयत तरुणाचे नाव आहे.

जळगावातील बोहरा गल्लीत सुनिल चव्हाण हा तरुण बांधकामाच्या ठिकाणी आईव-डील व बहिण यांच्यासोबत वास्तव्याला आहे. बोहरा गल्लीतील अग्रवाल फॅन्सी फटाके दुकानाचे मालक अनिल अग्रवाल यांनी त्यांच्या गणेश कॉलनीतील घरी साफसफाई करण्यासाठी सुनिल चव्हाण आणि त्याचा मित्र सागर सुभाष शिंदे यांना बुधवारी १ नोव्हेंबर रोजी सकाळी पाठविले होते.

सुनिल चव्हाण आणि सागर शिंदे हे दोघे गणेश कॉलनीतील घरी साफसफाई करत असताना सुनिलचा पाय खाली पडलेल्या तारेला स्पर्श झाल्याने त्याचा जागेवरच दुदैवी मृत्यू झाला. ही घटना सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी त्याच्या नातेवाईकांनी रूग्णाालयात आक्रोश केला होता. याबाबत अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---