दुर्दैवी ! सायंकाळची वेळ, बालिका शेतात खेळत होती, अचानक बिबट्यानं …

तळोदा : तालुक्यातील त-हावद पुर्नवसन येथे घराजवळून 3 वर्ष 7 महिन्याच्या बालिकेला बिबट्याने उचलून नेत एका शेतात लचके तोडल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना 6 मे रोजी घडली. दिव्यांशी तानसिंग पाडवी असे मृत बालिकेचे नाव आहे.

तळोदा तालुक्यातील .त-हावद पुर्नवसन येथे कानसिंग काश्या पाडवी यांच्या शेतात घर आहे त्या ठिकाणी 6 मे रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास त्यांची मुलगी दिव्यांशी तानसिंग पाडवी ( वय 3 वर्ष 7 महिने ) ही तिच्या आई सोबत आंघोळ करण्यासाठी गेली होती.

शेतातील घराच्या बाजुस तिची आई दुस-या मुलीस आंघोळ करण्यासाठी घरात घेण्यास गेली असता अचानक बिबट्या आला व दिव्यांशी हिस उचलुन प्रकाशा गावाच्या शिवारातील सर्व्ह नं 310/1 या शेतात बाजरीच्या शेतात घेऊन जाऊन तिस चावा घेऊन तिचे लचके तोडल्याने या हल्ल्यात दिव्याशी हिचा मृत्यू झाला.

याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात कानसिंग काश्या पाडवी यांनी खबर दिली. याप्रकरणी पुढील तपास पोहेका रामा वळवी करीत आहेत.