देवगांव ग्रामपंचायतीला सरपंचपतीसह ग्रामस्थांनी ठोकले कुलूप; काय आहे कारण ?

जळगाव : चोपडा तालुक्यातील धानोरा येथून जळवळच असलेल्या देवगाव ग्रामपंचायतीस ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारास कंटाळून सरपंचपतीसह ग्रामस्थांनी कुलूप ठोकले. ग्रामसेवक गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामपंचायतीस येत नसल्याने नागरिकांचे काम पेंडिंग आहे. दरम्यान, आज गुरुवारी संतप्त ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले.

चोपडा तालुक्यातील देवगांव येथील ग्रामपंचायत येथे एच .डी. सोनवणे हे ग्रामसेवक असून ते गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामपंचायतीस येत नसल्याने ग्रामस्थांना घराचे उतारे मिळत नाही , खरेदीविक्रीच्या नोंदी , घरकुलची कामे खोळंबली आहेत.

तसेच ग्रामसेवक गेल्या दिडवर्षापासून घरपट्टी , पाणीपट्टीच्या पावत्या फाडून परस्पर स्वतः खर्च केलेला असून बँकेत भरणा केलेला नाही. ग्रामसेवक सोनवणे हे येत नसल्याने गावात कोणतेही विकास कामे झालेली नाही. यामुळे देवगांव ग्रामस्थ व सरपंचपती रतन नारायण पाटील यांनी संताप व्यक्त करीत ग्रामपंचायतीस कुलूप ठोकले.

गटविकास अधिकारी, कार्यकारी अधिकारी व उपकार्यकारी अधिकारी ग्रा.पं. विभाग जळगांव यांना निवेदन देवून सदर ग्रामसेवक यांची बदली करुन नवीन ग्रामसेवक मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे .

ग्रामस्थांनी कामे खोळबंली
ग्रामसेवक हे येत नसल्याने ग्रामस्थांनी कामे खोळबंली आहेत
– सरपंच साविता रतन पाटील 

माझ्याकडे तीन ते चार गावांचा पदभार असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीस दररोज जाता येत नाही
– एच .डी. सोनवणे, ग्रामसेवक देवगांव