देवगोई घाटाचे निसर्ग सौंदर्य बहरले, पर्यटक आकर्षित

तळोदा :  मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या, संततधार पावसाने देवगोई भागामधील धबधबे डोंगरदऱ्यामधून वाहू लागले आहे. यामुळे देवगोई घाटाचे निसर्ग खुलला आहे. रिम-झिमत्या पावसामुळे, धबधब्यांमुळे, हिरव्यागार झाडां-झुडपांमुळे, धुक्याने देवगोई घाटाचे निसर्ग सौंदर्य उठून दिसत आहे.

अक्कलकुव्यापासून काही अंतर गेल्यावर देवगोईचा घाट लागतो. या घाटाजवळून जेव्हा गाडी वळण घेते , तेव्हा समोरच उंचावरून खाली कोसळणारा धबधबा जाणाऱ्या वाटसरूंचे डोळे दिपवून टाकत आहे. सध्या गेल्या दोन महिन्यापासून या भागामध्ये पावसाची रिम-झिम सुरू आहे. त्यामुळे या भागातील डोंगर दऱ्या तसेच उंच ठिकाणी सर्वत्र हिरवीगार चादर, या डोंगराला माखलेली दिसून येत आहे. त्याचबरोबर या भागांमध्ये असणारे नदी- नाले त्याचबरोबर मोठ-मोठे ओढे दुधडुन भरून वाहत आहेत तसेच लहान-मोठे धबधबे देखील ओसंडून वाहत आहेत.

अक्कलकुव्यापासून मोलगी पर्यंत जाणारा रस्ता हा नव्याने घाटाचे रूदी करण , कॉक्रेटीकरण करून तयार करण्यात आले आहे त्यामुळे पर्यटक देखील या रस्त्याने जाणे पसंत करीत आहेत. रस्त्याने जात असताना सातपुडा पर्वत पर्यटकांना आपल्या बाजूने आकर्षित करत आहे.

विविध प्रजातीची वृक्ष तसेच सर्वत्र पसरलेली हिरवळ तसेच दाट धुक्याने माखलेला सर्व परिसर प्रत्येकाचे मन मोहित करत आहे. एकंदरीतच सातपुडा पर्वतरांगामधून प्रवास करताना लहान मोठे धबधबे पाहून त्या ठिकाणी उभे राहिल्या वाचून पर्यटकांना राहवले जात नाही. असा हा सातपुडा पर्वत सर्वांना मोहिनी घालत आहे.