देवदर्शनासाठी निघाले, अर्ध्या वाटेतच काळाचा घाला… घटनेनं हळहळ

तरुण भारत लाईव्ह । २६ सप्टेंबर २०२३। पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जेजुरी येथे देवदर्शनासाठी चाललेल्या नवदांपत्याला घेऊन जाणारी रिक्षा सासवडजवळ विहिरीत पडली. त्यात नवदांपत्यासह एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर रिक्षातील सर्वांशी कुटुंबाचा संपर्क तुटला होता.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील धायरी येथून खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या नवविवाहितांची रिक्षा ही सासवड जवळ असणाऱ्या बोरावके मळा येथे रस्त्याच्याकडेला असलेल्या विहिरीमध्ये पडली. मात्र नवदांम्पत्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्या ठिकाणाहून जात असताना विहिरीतून वाचवा, वाचवा असं कोणीतरी ओरडल्याचा आवाज आला. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले तर दोन व्यक्ती त्यांना त्या विहिरीत दिसल्या आणि यानंतर ही माहिती सासवड पोलिसांना देण्यात आली.

सासवड पोलिसांनी दोघांना सुखरूप बाहेर काढलं आहे. मात्र नवविवाहित जोडपं आणि एका तरुणीचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. लग्नानंतर नवदाम्पत्य देवदर्शनाला जेजुरीला जात असताना हा अपघात घडला असून या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.