---Advertisement---

देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना इशारा; म्हणाले…

---Advertisement---

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निकालानंतर विरोधकांकडून शिंदे-फडणवीसांवर जोरदार टीका करण्यात येत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनीही पलटवार केला आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व उध्दव ठाकरेंवर देखील टीका केली आहे.

फडणवीस म्हणाले की, उध्दव ठाकरे यांना नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा अधिकार नाहीय. कारण जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून निवडून आले, ज्यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी विचार, युती, आणि पक्ष ही सोडला, ते कोणत्या अधिकाराने नैतिकता सांगतात असा सवाल करत फडणवीसांनी शरद पवारांवरही शरसंधान साधले.

शरद पवार यांचा नैतिकतेच्या संबंध आहे का? जर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेच भाजपला नैतिकता शिकवायची ठरवली तर इतिहासात जावे लागेल. वसंत पाटील यांचे सरकार कसे गेले इथं पासून सुरू करावे लागेल, ते जेष्ठ नेते आहेत, समजून घ्यावे, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. यामुळे आता राष्ट्रवादीचे नेते यास काय प्रतिउत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

१६ आमदारांच्या अपात्रतेचे सर्व अधिकार अध्यक्षांना

सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे १६ आमदारांच्या अपात्रतेचे सर्व अधिकार अध्यक्षांना दिले आहेत. अशा प्रकारे जर स्पिकरवर दबाव आणण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर ते फ्री आणि फेअर अश्याप्रकारच्या न्यायप्रक्रियेत बसत नाही. मला वाटत नाही की स्पिकर कोणत्याही दबावाला बळी पडतील. जे कायद्यामध्ये आहे. जे संविधानामध्ये आहे. जे सुप्रिम कोर्टाने सांगितले आहे त्यानुसार महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निर्णय करतील योग्य सुनावणी करत योग्य तोच निर्णय देतील अशी अपेक्षा आहे, असे फडणवीस म्हणाले.

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment