देवेंद्र फडणवीसांनी बजावला मतदानाचा हक्क

लोकससभा मतदानाचा आजपासून पहिला टप्पा सुरु झाला आहे. देशातील १०२ जागांवर मतदान होणार आहे, यामध्ये महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात मतदान होणाक आहे. २१ राज्यांमध्ये १०२ मतदार संघात १६२५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.

सकाळी ७ वाजता सुरु झाले आहे तर ते संध्याकाळी ६ पर्यंत चालू असणार आहे. पहिल्या टप्प्यात आज विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदार संघात मतदान होत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर जवान तैनात करण्यात आले आहेत. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभा मतदारसंघांसाठीही आज मतदान होत आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. शिवाय सर्व लोकांनी मतदान करावं, लोकशाहीला मजबूत करावं, असे आवाहन देखील केले.