देशातील मुलींकरिता नवे मार्ग अघडणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

तरुण भारत लाईव्ह । २७ सप्टेंबर २०२३। संसदेच्या नव्या इमारतीत महिला आरक्षण विधेयक मंजूर होणे ही बाब देशाच्या नव्या भविष्याचे प्रतीक आहे. देशातील मुलींकरिता नवीन मार्ग उघडणे हेच माझ्या सरकारचे मुख्य धोरण आ.हे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. पंतप्रधान मोदी आज रोजगार मेळ्याला आभासी माध्यमातून संबोधित करत होते.

यावेळी त्यांनी आणखीन ५१ हजार तरुण तरुणींना केंद्र सरकारमधील विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये नोकऱ्यांची नियुक्तीपत्रे प्रदान केली. आज राज्यकारभारात तंत्रज्ञानाचा वापर आणखीन वाढवण्यावर मोदी यांनी भर दिला. सरकारी योजनांच्या अंमलबजावणी तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने भ्रष्टाचाराला पूर्णपणे आळा बसला आहे. सरकार विषयी विश्वासार्हता वाढली आणि शासकीय योजनांचा संपूर्ण लाभ सर्वसामान्यांना मिळत आहे असे पंतप्रधान म्हणाले. नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी नागरिक प्रथम हे तत्व समोर ठेवून काम करावे आणि प्रशासकीय कामकाजात अधिकाधिक गुणवत्ता आणण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्यावा.

सामान्य नागरिकांच्या योजनांची प्रभावी आणि तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी माझे सरकार मिशन मोडवर काम करीत आहे. या तुमचा सहवास सर्वांचाच  सहभाग आवश्यक आहे. जेणेकरून या १००% यश मिळेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ऐतिहासिक निर्णय घेण्याची आणि देशाला विकसित राष्ट्राकडे नेण्याची हीच वेळ आहे. सरकारने अलीकडेच नव्या संसद भवनात ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक पारित केले आहे.

देशातील 50 टक्के लोकसंख्येला यामुळे बळकटी मिळणार आहे. मागील तीस वर्षांपासून प्रलंबित हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात विक्रमी मताधिक्याने पारित झाले. महिलांना लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये ते पुस्तके आरक्षण देण्याची कल्पना आली त्यावेळी तुमच्यापैकी अनेकांचा जन्म झाला नव्हता आजच्या नव्या भारताची स्वप्न ही मोठी आहेत अंतराळ क्षेत्रापासून क्रीडांगणापर्यंत मुलींची उपस्थिती सातत्याने  वाढत आहे. आता त्यांच्या खांद्यावर शस्त्र दलांचीही महत्त्वाची जबाबदारी आलेली आहे. त्यांच्यासाठी भविष्यात आणखी नवीन मार्ग उघडले जाणार आहेत असे मोदी यांनी सांगितले.