देशातील ‘या’ राज्यांमध्ये आज पडू शकतो पाऊस, जाणून घ्या सविस्तर

उत्तर भारतात हवामानात सातत्याने बदल होत आहेत. गेल्या आठवड्याच्या अखेरीस पावसामुळे पुन्हा एकदा थंडी परतली, तर सोमवारी दिवसभर ऊन पडले. त्यामुळे वातावरण तापले. दरम्यान, हवामान खात्याने देशातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. यासोबतच हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आज म्हणजेच मंगळवारी पश्चिम हिमालयीन भागात एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत आहे. त्यामुळे पाऊस आणि बर्फवृष्टीचा नवा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ७ मार्चपर्यंत असेच वातावरण राहील. तर आसाम आणि मेघालय या ईशान्येकडील राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.