शहादा : जन्मता असलेल्या अपघातवर मात करून सर्वसामान्य बालकासारखे काम करून शिक्षण घेणारा असलोद येथील गणेश. त्याच शैक्षणिक पालकत्व आता शिवसेनेने स्वीकारलं आहे. त्याच्या उच्च शिक्षणापर्यंतची जबाबदारी स्वीकारात आज त्याला शैक्षणिक साहित्याची मदत शिवसेनेचे जिल्हासह संपर्कप्रमुख अरुण चौधरी यांनी केली.
घरात अठरा विश्व दारिद्र्य अशात जन्मापासून दोन्ही हाताने अपंग आणि त्यातही अवघ्या आठ वर्षाच्या चिमुकल्या वयात आई घर सोडून गेली तरीही या विपरीत परिस्थितीमध्ये शिक्षणाची प्रबळ इच्छाशक्ती असलेला एक गणेश आपल्या अपंगत्वावर मात करत आयुष्याच्या लढा लढत आहे. त्याच्या जगण्याच्या जिद्दीची कहाणी वृत्तपत्रातून विविध मथळ्याखाली प्रसिद्ध केल्यानंतर शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी यांनी त्याची दखल घेत आज गणेशचा जिद्दीच्या संघर्षात येणाऱ्या भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी दत्तक घेऊन गणेशचा शिक्षणाचे पालक झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
तालुक्यातील असलोद येथील आठ वर्षीय गणेश अनिल माळी त्याच्या कर्तृत्वामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. जन्माता दोन्ही हाताने अपंग असलेला गणेश उच्च शिक्षणाचे ध्येय बाळागुन भविष्यात मोठा अधिकारी किंवा संरक्षण दलात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे. याबाबत वृत्तपत्रात वृत्तांकन प्रकाशित झाल्याबद्दल अनेक मदतीचे हात त्याच्यापर्यंत पोहोचत आहे. अनेकांनी त्याच्यावर वैद्यकीय उपचारासह इतर खर्च करण्याची तयारी उचलली आहे.
त्यातच शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी यांना गणेश बद्दल वृत्तपत्रातून माहिती मिळाल्यानंतर आज असलोद येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन गणेशची भेट घेतली अपंग असतानाही त्यावर मात करीत अभ्यासा प्रति असलेली त्याची जिद्द पहात गणेशच्या उच्च शिक्षणापर्यंत लागणारा शैक्षणिक साहित्याचा सर्व खर्च यापुढे शिवसेना करेल त्याचप्रमाणे पैश्या अभावी त्याच्या शिक्षणात कुठलाही खंड पडणार नाही. अशी, जबाबदारी स्वीकारत त्याला शैक्षणिक साहित्यासह खाऊ मदत स्वरूपात दिला.
यावेळी उपसरपंच विलास पवार, ग्रामपंचायत सदस्य दीपक गिरासे, मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य संतोष चव्हाण, राकेश थोरात, शिक्षिका सुरेखा शिंदे, गणेशचे पालक अनिल माळी, भास्कर अहिरे, मंदाणा येथील माजी उपसरपंच अनिल भामरे, पत्रकार रुपेश जाधव, हिरालाल रोकडे, शिवसेना शहर प्रमुख सागर चौधरी, शिवसेनेचे जिल्हा सह संपर्कप्रमुख यांच्या सुपुत्री अश्विनी चौधरी, शिवानी चौधरी या उपस्थित होत्या.
शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण चौधरी यांनी गणेश अनिल माळी या अपंग विद्यार्थ्याला उच्च शिक्षण होईस्तव शिक्षणासाठी दत्तक घेतले असल्याने त्याच्या पुढील शिक्षणाच्या अडचणी दूर झाल्या आहेत. त्याचे पुढील शैक्षणिक आयुष्यात शिक्षणासाठी लागणाऱ्या संपूर्ण साहित्यांची जबाबदारी आजपासून शिवसेना घेत असल्याचे सांगितले आहे. अश्या दातृत्वाची समाजाला अत्यंत गरज आहे. जिल्हा परिषद शाळा असलोद व ग्रामस्थ तसेच त्याच्या पालकांकडून आम्हीं त्यांचे आभार व्यक्त करतो . –राजेंद्र पाटील- मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा असलोद ता.शहादा
शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी व त्यांच्या दोन्ही सुपुत्रिंनी गणेशला भेटून शहादा येथे परत आल्यानंतर त्यांनी गणेशला पुन्हा शहादा येथे बोलावीत त्याच्या इच्छेनुसार त्याला बाजारपेठेत नेत त्याच्या आवडीचे कपडे, बूट, सॉक्स व चॉकलेट-फळे घेऊन दिली. गणेशने अश्विनी व शिवानी यांना मोटर सायकल वरून शहरात चक्कर मारू असे आपुलकीने सांगितल्यानंतर दोन्ही बहिणींनी त्याला शहर दर्शन घडवील्यानंतर गणेशचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.