पाटण्यातील फुलवारी शरीफ परिसरात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, यात एकीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, घटनेला तीन दिवस उलटूनही पोलीस आरोपीला अटक करू शकले नाही. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये पोलिसांबद्दल प्रचंड रोष आहे. अत्याचार आणि खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेल्या पोलिस पथकावर गुरुवारी गावकऱ्यांनी दगडफेक केली. संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांविरोधात घोषणाबाजीही केली. दगडफेकीनंतर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असले तरी कोणालाही दुखापत झाली नाही.