धक्कातंत्र… जळगावमधून ठाकरे गटाकडून करण पवारांना उमेदवारी जाहीर

जळगाव/मुंबई । लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली दुसरी उमदेवार यादी जाहीर केली आहे. यात ठाकरे गटात नुकताच प्रवेश केलेल्या करन पवार यांना जळगाव लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी आपले कट्टर समर्थक पारोळ्याचे करण पवार यांच्यासह शिवसेना ठाकरे गटात आज प्रवेश केला.  त्यामुळे उन्मेश पाटील जळगावातून तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र ठाकरेंनी जळगावमध्ये धक्कातंत्र वापर करत करण पवार यांना जळगावातून मैदानात उतरवलं आहे.

ठाकरेंच्या दुसऱ्या यादीत कोण?
कल्याण लोकसभा – वैशाली दरेकर
हातकणंगले – सत्यजीत पाटील
पालघर – भारती कामडी
जळगाव – करण पवार