Crime News : राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. अशातच पुन्हा एका गावात 15 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. धक्कादायक म्हणजे, सततच्या अत्याचारातून पीडीता गर्भवती राहिली. या प्रकरणी संशयित प्रवीण राजेंद्र सपकाळे (22, पारोळा ता.) यास अटक करण्यात आली.
पारोळा तालुक्यातील एका गावात पीडित अल्पवयीन तरुणी वास्तव्यास आहे. पीडितेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित प्रवीण राजेंद्र सपकाळे (22, पारोळा तालुका) याने नोव्हेंबर 2022 ते आजपर्यंत पीडितेशी ओळख वाढवून, तसेच घरी येवून पीडितेवर वारंवार अत्याचार केला. ही बाब कुणाला सांगितल्यास पीडीतेच्या लहान बहिणीवरही अत्याचार करण्याची धमकी दिली.
पीडीतेच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिची अमळनेरातील डॉक्टरांकडे वैद्यकीय तपासणी केली. त्यात पीडीता गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. पीडतेने कुटूंबासह पारोळा पोलीस ठाणे गाठत तक्रार दिल्यावरून संशयिताविरोधात अत्याचारासह पोस्कोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत.