---Advertisement---

धक्कादायक! चाकून भोसकून लहान भावाची निर्घुण हत्या

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । १० सप्टेंबर २०२३। नाशिकच्या मालेगावमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सक्ख्या भावनेचं आपल्या लहान भावाचा खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जाविद अहमद मोहम्मद जमील असे मृत तरुणाचे नाव आहे. तर मुद्दसीर अहमद मोहम्मद जमील असे आरोपी भावाचे नाव आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मृत जाविद व आरोपीमध्ये नेहमीच भांडणे होत होती. या वादातूनच मुद्दसीरने जाविदचा खून केला. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांवनी धाव घेत आरोपी भावाला अटक केली. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment