---Advertisement---

धक्कादायक ! डोक्यात दगड टाकून तरुणाचा खून; जळगाव जिल्ह्यातील घटना

---Advertisement---

एरंडोल : तालुक्यातील सावदा प्र.चा येथील बस स्थानकाजवळ एका २५ वर्षीय तरुणाचा अज्ञातांनी डोक्यात दगड टाकून खून केला. या प्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. इंदल प्रकाश वाघ ( २५) असे मयत तरुणाचे नाव आहे.

एरंडोल तालुक्यातील सावदा प्र.चा येथील बस स्थानकाजवळ गावातील जुनी भिलाटीतील रहिवासी इंदल प्रकाश वाघ ( २५) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. इंदल हा दगड फोडून आपल्या परिवाराचा उदरनिवार्ह करीत होता. गेल्या काही दिवसापासून त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नव्हती.

दरम्यान, इंदल हा १० रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. बस स्थानकानजीक रात्री १२ ते पहाटे ४ वाजेच्या दरम्यान काही अनोळखी इसमांनी त्याच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना पहाटे ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

या प्रकरणी सावदा गावाचे पोलीस पाटील पवार यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. धरणगाव पोलीस निरीक्षक पंकज देसले, प्रभारी एपीआय प्रशांत कंडारे, पोलीस हवालदार वसंत निकम, पोलीस शिपाई प्रदीप सोनवणे, मोहन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment