Crime News : पोलीस अधिकाऱ्याने स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात आज मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. अशोक नजन (४०) असे आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
अंबड पोलीस ठाण्यात अशोक नजन हे पोलीस निरीक्षक म्हणून काम करत होते. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास आपल्या केबिनमध्ये बसलेले असताना त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून, पोलीस निरीक्षकाने आत्महत्या का केली ? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.