तरुण भारत लाईव्ह । ११ सप्टेंबर २०२३। नायजेरिया मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. नायजेरियातील सेंट्रल नायजर राज्यातील मोकवा भागात बोट उलटून २६ जणांचा मृत्यू झाला असून ४४ लोक अजूनही बेपत्ता आहेत. मोकवा गावाजवळ ही बोट उलटली. सध्या शोधकार्य सुरू आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना हि बोट शेतात घेऊन जात असताना ही दुर्घटना घडली. या बोट मध्ये सुमारे १०० हुन जास्त प्रवासी प्रवास करत होते. या दुर्घटनेत २६ लोकांचा मृत्यू झाला आणि ४४ लोकांचा शोध सुरु आहे. या अपघातात ३० जणांना वाचवण्यात यश आले आहे. मृत्यू झालेल्या लोकांमध्ये जास्त करून लहान मुले आणि महिला होती.
नायजेरियन राज्य आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेच्या सहकार्याने सागरी पोलीस आणि स्थानिक गोताखोर पाण्यात बुडालेल्या लोकांचा शोध घेत आहेत. दोन महिन्यांतील नायजेरियामधील हा दुसरा मोठा अपघात आहे. जुलै महिन्यात बोट बुडाल्याने १०० जणांचा मृत्यू झाला होता.