धुळे : कौटुंबिक वादातून महिलेवर पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार धुळ्यातील मिल्लतनगरातील अकबर बेग गार्डन परिसरात सोमवारी उघडकीस आला.
याप्रकरणी पतीसह सहा जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात बुधवारी दाखल झाला. याबाबत तेहरीन मोहम्मद अली सय्यद (वय २८) या महिलेने फिर्याद दाखल केली.
फिर्यादीनुसार, तेहरीन आणि तिच्या पतीमध्ये भांडण होते. त्यावरून महिलेला मारहाण करण्यात आली. तिला इतरांनी पकडून तिच्या अंगावर पेट्रोल टाकण्यात आले. तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
स्वतःची सुटका करून घेत तेहरीन सय्यद हिने चाळीसगाव रोड पोलिस ठाणे गाठले आणि फिर्याद दाखल केली. त्यानुसार, तिचे पती मोहम्मद अली समद अली सय्यद (वय ३२, रा. मिल्लतनगर, धुळे) याच्यासह ६ जणांविरोधात भादंवि कलम ३०७, १४३, १४७, ३२३, ५०४, ५०६, ३४ सह मुंबई पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली.