धक्कादायक! मुक्ताईनगरमध्ये उष्माघातामुळे शेकडो शेळ्यांचा मृत्यू
Published On: मे 25, 2024 1:57 pm

---Advertisement---
मुक्ताईनगर। मुक्ताईनगर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उष्माघातामुळे शेकडो शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना कुऱ्हाकाकोडा येथे घडली. यामुळे मेंढपाळ यांचे मोठे नुकसान झाले.
याबाबत असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हाकाकोडा येथे वाढत्या उष्माघातामुळे 100 पेक्षा जास्त शेळ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन मुख्यमंत्र्यांना नुकसान ग्रस्त मेंढपाळ कुटुंबीयांना मदतीचे आव्हान केले आहे. तसेच स्थानिक पशू चिकित्सक यांनी या मेंढ्यांचे शवविच्छेदन केले असून उष्माघातामुळे शेळ्या मरण पावल्याचे निदान केले आहे.