---Advertisement---

धक्कादायक! मोबाईल न दिल्याने १५ वर्षीय मुलीची आत्महत्या

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । १३ ऑक्टोबर २०२३। आत्महत्येचे प्रमाण हे वाढत चालले आहे. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. अगदी छोट्या कारणावरून अनेक तरुण आत्महत्या सारखे टोकाचे निर्णय घेतात. अशातच पुण्याहून एका दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची बातमी समोर येत आहे. बुधवारी रात्री हि घटना घडली असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, आर्या गणेश सावंत असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. आर्याचा मोबाईल वरून घरच्यांशी वाद झाला होता. काही कारणांसाठी आर्याला मोबाईल हवा होता मात्र घरच्यांनी तिला मोबाईल देण्यास नकार दिला या गोष्टीचा राग आल्याने तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. आर्या इमारतीच्या सातव्या मजल्यावर गेली आणि थेट सातव्या मजल्यावरून उडी मारली. यानंतर तिच्या पालकांनी तिला रुग्णालयात हलवलं पण त्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली.

आर्याचे आई वडील दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर असून त्यांना दोन मुली आहेत आर्या हि त्यांची मोठी मुलगी होती. घडलेल्या घटनेमुळे आई वडिलांना मोठा धक्का बसला आहे. पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment