यावल : शहरातील महाजन गल्लीत एका उच्चशिक्षित तरुणाने राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात तरुणाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तात्कळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची घटना १७ जुन रोजी रात्री ८ .३० वाजेच्या सुमारास घडली. अक्षय प्रमोद करांडे (२७) असे मयत तरूणाचे नाव आहे.
यावल शहरातील महाजन गल्लीत अक्षय प्रमोद करांडे या तरूणाने १७ जुन रोजी रात्री ८ .३० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात तरुणाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तात्कळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची घटना १७ जुन रोजी रात्री ८ .३० वाजेच्या सुमारास घडली. या बाबत अद्याप पोलीसात नोंद करण्यात आली नसल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, उच्चशिक्षीत अक्षय करांडे हा तरुण पुणे येथे एका खाजगी कंपनीत सॉप्टवेअर अभियंता म्हणुन नौकरीस होता. मात्र, त्याने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मृतदेहाचे शवविच्छेदन भुसावळ येथे ट्रामा सेन्टरमध्ये करण्यात आले असून, मृतदेह अंत्यविधीसाठी यावल येथे आणले जात असल्याची समोर आली आहे.