---Advertisement---

धक्कादायक! शेती वाटणीच्या वादातून मुलानेच जन्मदात्या बापाला संपविले

---Advertisement---

जामनेर । शेती वाटणीच्या वादातून मुलानेच जन्मदात्या बापाच्या डोक्यात फावडे घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे घडली. दरम्यान, नाना बडगुजर (82) असे मयताचे नाव असून कैलास नाना बडगुजर (56) संशयित मुलाचे नाव असून याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत असे की, नाना बडगुजर यांचे तरंगवाडी शिवारात शेत असून ते शनिवारी सकाळी शेतात कपाशी वेचत असताना त्यांचा मुलगा कैलास हा शेतात आला व वडीलांसोबत वाटणी वरून वाद घालू लागला. शाब्दीक वाद वाढत गेल्यानंतर आरोपी कैलासने वडील नाना बडगुजर यांच्या डोक्यात भुसा भरण्याच्या फावडयाने डोक्यात जोरात वार करताच नाना बडगुजर यांचा जागीच मृत्यू झाला.

घटना घडली तेव्हा आरोपीचा मुलगा विशाल आणि त्याची पत्नी शेतात काम करीत होते. विशालने वडिलांनी आजोबाच्या डोक्यात वार केल्याचे बघताच धाव घेतली. त्याने वडीलांच्या हातुन फावडे हिसकावून जखमी आजोबांना सावरण्याचा प्रयत्न केला मात्रते हालचाल करीत नसल्याचे पाहून आरोपी पसार झाला. आरोपीचा मुलगा विशाल कैलास बडगुजर (33) याने वडिल तथा संशयित कैलास बडगुजर यांच्या विरोधात तक्रार दिल्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment