धडगावचे तस्कर करत आहेत पुष्पाची नक्कल, वनविभागाने केली ३५ किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग

धडगाव : सातपुडाच्या पर्वत रांगेत खैर आणि सागवान झाडे मोठ्या प्रमाणात आहे. या भागात लाकूड तस्कर यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच धडगाव पोलिसांनी मोठाही कारवाई करत तब्बल ५२ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

तालुक्यातील  राजबर्डी गावात अवैद्य पद्धतीने लाकडांची वाहतूक केली जात असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानुसार छापा टाकला असता  वन विभागाच्या  टीमला चकवादेत पुष्पा स्टाईल ने तस्करांनी पळ काढला. राजबर्डीपासून तब्बल 35 किलोमीटर अंतरावर वन विभागाने वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग केला मात्र अंधाराच्या फायदा घेत लाकूड तस्करांनी लाकडं रस्त्यावरच फेकून देत पड काढला.

या कारवाईत वन विभागाने काथा बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खैर जातीचे 52 हजार 850 रुपयांची एकूण 64 नग लाकडं जप्त धडगाव वन विभागाने जप्त केले असून वन गुन्हा कायद्याअंतर्गत अज्ञात तस्कराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयास्पद्य वाहनाचा तपास घेतला जात असून पुढील तपास वनपाल बी एम परदेशी करत आहे.