धडगाव जि.प.शाळेची शैक्षणिक सहल उत्साहात; ४० विद्यार्थींचा सहभाग

धडगाव : येथील जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच ऐतिहासिक पर्यटनस्थळांना भेट दिली. यात  ४० विद्यार्थींनी सहभाग घेतला. यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ लेणी, देवगिरी किल्ला, सिद्धार्थ गार्डन, बीबी का मकबरा या पर्यटनस्थळांना भेट देत ऐतिहासिक माहिती जाणून घेतली.

सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान,आकलन, चिकित्सा, व्यक्तिमत्व विकास व अवतीभोवतीचे जग कसे चालत आहे हे सहलीचे महत्व लक्षात घेत शिक्षण प्रेमी हरसिंग पावरा, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राकेश पावरा, शाळेचे मुख्याध्यापक रघुनाथ बळसाने यांनी सहलीचे नियोजन केले होते. सहल यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक रघुनाथ बळसाने, माजी मुख्याध्यापक तथा ज्येष्ठ शिक्षक बी.के पावरा, मोतीराम पावरा, प्रवीण पाटील, विभावरी पाटील, कागडा पटले, कैलास सावळे, दीपक दुसाने आदींनी परिश्रम घेतले.