नंदुरबार : धडगाव नगरपंचायतीतील प्रभाग क्रमांक 14 साठी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (शिंदे गट) ममता पावरा विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या बिना पावरा यांच्या पराभव केला. यावेळी असंख्य शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.
धडगाव नगरपंचायतीतील प्रभाग क्रमांक 14 मधील काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका बिना पावरा यांनी काही दिवसांपूर्वी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर झाला. निवडणुकीत काँग्रेसतर्फे बिना पावरा तर शिवसेना शिंदे गटाकडून ममता पावरा यांच्यात लढत झाली. लढतीत काँग्रेसचे उमेदवार बिना पावरा यांना पराभव पत्करावा लागला तर शिवसेना शिंदे गटाच्या ममता पावरा यांनी 358 मतांनी विजय झाला.
धडगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता असून, त्यात विजयी उमेदवार ममता पावरा यांची भर पडलेली आहे. ग्रामपंचायतीवर भगवा फडकवण्यासाठी धुळे, नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, अक्कलकुवा विधानसभा संपर्कप्रमुख विजयसिंग पराडके, जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे यांनी प्रयत्न केले.