नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या घरातून मोठा पैसा जप्त करण्यात आल्यानंतर आता आयकर विभागाची टीम त्यांच्या घराची जमीन खोदण्याच्या तयारीत आहे. मातीखाली दडवलेल्या दागिन्यांसह इतर वस्तूंचा मशीनद्वारे शोध घेतला जात आहे. झारखंडमधील धीरज साहू यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यांमध्ये आतापर्यंत ३५१ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. नोटांचे इतके बंडल सापडल्यानंतरही धीरज साहूने यापेक्षा कितीतरी पटीने मोठा खजिना दडवल्याचा आयकर विभागाला संशय आहे. मुळे आता आयकर विभागाचे पथक रांचीच्या रेडियम रोडवर असलेल्या धीरज साहू यांच्या घराची जमीन खोदण्याच्या तयारीत आहे.
आयटी टीम जिओ सर्व्हिलन्स सिस्टीम मशीनद्वारे घराच्या जमिनीचा शोध घेत आहे. मातीखाली दडवलेल्या दागिन्यांसह इतर वस्तूंचा मशीनद्वारे शोध घेतला जात आहे. जमिनीखाली दडवलेले दागिने किंवा इतर धातूच्या वस्तू आहेत का, याचा शोध घेण्यासाठी आयकर विभागाचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. आयकर विभागाच्या टीमने रांची आणि खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या संबंधित इतर ठिकाणांवर छापे टाकले. रोख रक्कम इतकी होती की, नोटा मोजण्याचे यंत्रही बिघडले होते.
८० पथकांचे रात्रंदिवस काम…
आयकर विभागाच्या पथकाने 6 डिसेंबर रोजी बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड आणि तिच्या प्रवर्तकांवर छापे टाकण्यास सुरुवात केली होती. ही कारवाई करण्यासाठी, प्राप्तिकर विभाग आणि अनेक बँकांमधील सुमारे 80 लोकांच्या नऊ टीम तयार करण्यात आल्या, ज्या 24×7 काम करत होत्या.