---Advertisement---

धुळे हादरलं! तरुणीची गळा चिरुन हत्या; पोलिसांना जवळच्या व्यक्तीवर संशय

---Advertisement---

धुळे : शहरातील नकाणे रोडवरील विघ्नहर्ता हॉस्पिटल मागे राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीचा अज्ञात तरुणाने गळा चिरुन खून केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. निकिता कल्याण पाटील (२१) असे मृत तरुणीचे नाव आहे.

विघ्नहर्ता हॉस्पिटलमागे निकिता कल्याण पाटील ही तरुणी वास्तव्यास होती. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ती घरी एकटीच असताना तिच्यावर अज्ञात तरुणाने हल्ला चढवला. हल्ला झाल्यावर ती मोठ्याने किंचाळल्याने शेजारी राहणारे लोक तेथे आले तेव्हा तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.

हल्ला करणारा मात्र तेथून फरार झालेला होता. शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना खबर दिली. तोपर्यंत तरुणीचा मृत्यू झाला होता. निकिता हिच्या गळ्यावर आणि पोटावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती डीवायएसपी सचिन अहिरे यांनी दिली.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment