धुळ्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात शंभराहुन अधिक प्रशिक्षणार्थीं पोलिसांना जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित जवानांना तातडीने हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हा प्रकार कशामुळे झाला याची अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही.
धुळे येथील प्रशिक्षण केंद्रात सहाशे प्रशिक्षणार्थी आहेत. या सर्वांनी १४ मार्चला सायंकाळी सातनंतर जेवण केले. यानंतर येथील शंभराहून अधिक प्रशिक्षणार्थींना मळमळ, उलटी, जुलाब असा त्रास जाणवू लागला. त्यामुळे प्राचार्य विजय पवार यांनी यंत्रणेच्या मदतीने शंभरावर प्रशिक्षणार्थींना तातडीने जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी नेले. यानंतर सर्व प्रशिणार्थींवर रात्री उपचार करण्यात आले.