धुळ्यात शेतकऱ्यानं उचललं धक्कादायक पाऊल

धुळे : निमडाळे येथील शेतकऱ्याने धक्कादायक पाऊल उचलल्याची घटना समोर आहे. येथील एका २२ वर्षीय तरुण शेतकऱ्याने शेतातील खळ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. यासंदर्भात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निमडाळे (ता. धुळे) येथील जुगल किशोर पाटील या २२ वर्षीय तरूण शेतकऱ्याने खळ्यातील घरात लोखंडी पाईपास दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करीत मृत घोषित केले.

सोमवारी दुपारी ही घटना घडली. पश्चिम देवपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिस हेड कॉन्स्टेबल नागरे तपास करीत आहेत. दरम्यान, तरुणाने आत्महत्या का आणि कशासाठी केली याचे कारण समजू शकले नाही. पोलीस पुढील तपास करीत आहेत.