धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यातील 50 महाविद्यालये प्राचार्यांविना !

डॉ. पंकज पाटील
जळगाव :
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी सलंग्न असलेल्या धुळे जिल्ह्यातील 27 तर नंदुरबार जिल्ह्यातील 24 महाविद्यालयांत प्राचार्याची पदे रिक्त आहेत. प्राचार्य नसल्याने वरिष्ठ प्राध्यापकांना तात्पुरत्या स्वरूपात प्रभारी प्राचार्य म्हणून मान्यता घेत कामकाज करण्यात येत आहे. मात्र प्रभारी प्राचार्यांना धोरणात्मक किंवा इतर वित्तीय अधिकारी नसल्याने अडचणी येत असतात.

कला वाणिज्य व विज्ञान
विविध विद्याशाखांची मिळून धुळे जिल्ह्यात एकूण 57 तर नंदुरबारला 39 महाविद्यालये आहेत. त्यात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेची धुळ्यात 34 तर नंदुरबारला 25 महाविद्यालये आहेत.धुळे जिल्ह्यात 19 तर नंदुरबार जिल्ह्यात 9 महाविद्यालयात पुर्णवेळ प्राचार्य आहेत. धुळ्यात 15 तर नंदुरबारला 16 महाविद्यालयात पूर्णवेळ प्राचार्यांची पदे अजूनही रिक्तच आहेत.

ललित कला, विधी व समाजकार्य कॉलेज
धुळे व नंदुरबार जिल्ह्यात एकही ललित कला महाविद्यालय नाही. धुळ्यात एक समाजकार्य महाविद्यालय असून त्ोथे प्राचार्य आहेत. मात्र नंदुरबारला प्राचार्य नाहीत. धुळ्यात दोन तर नंदुरबारच्या एका विधी महाविद्यालयात प्राचार्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

अभियांत्रिकी महाविद्यालय
धुळे जिल्ह्यात असलेल्या तीन अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य आहेत.

औषधनिर्माणशास्त्र
धुळे जिल्ह्यात सहा औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांपैकी चार महाविद्यालयात प्राचार्य आहेत. बोराडी व नगाव येथील महाविद्यालयात प्राचार्य पद रिक्तच आहे. नंदुरबारला 3 महाविद्यालयापैकी एक पद रिक्त आहे.

शिक्ष्ाणशास्त्र व शारीरिक शिक्ष्ाणशास्त्र महाविद्यालये
धुळे जिल्ह्यात 7 तर नंदुरबारला 6 शिक्ष्ाणशास्त्र व शारीरिक शिक्ष्ाणशास्त्र महाविद्यालये आहेत. यापैकी धुळ्यात व नंदुरबारला एकाच महाविद्यालयात पूर्णवेळ प्राचार्य कार्यरत आहेत. धुळ्यात 6 तर नंदुरबारला 4 महाविद्यालयांचा कारभार प्राचार्याविनाच चालत आहे.

प्रभारी प्राचार्य

पुर्णवेळ प्राचार्य नसल्याने महाविद्यालयाचे प्रशासकीय कामकाज सुरू राहण्यासाठी महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापकांना तात्पुरत्या स्वरुपात प्रभारी प्राचार्य म्हणून मान्यता घेण्यात येत्ो. परंत्ुा त्यांना धोरणात्मक किंवा वित्तीय अधिकारांबाबत मर्यादा येत्ो. यामुळे महाविद्यालयाच्या प्रशासकीय व विद्यापीठाच्या कामकाजात मात्र अनेक अडचणी येत असतात.